Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीचिंचवड मतदारसंघात "टिफिन बैठक" उत्साहात - भाजपाचे निमंत्रित सदस्य शंकर जगताप यांचा...

चिंचवड मतदारसंघात “टिफिन बैठक” उत्साहात – भाजपाचे निमंत्रित सदस्य शंकर जगताप यांचा पुढाकार

मोदी@9महा-जनसंपर्क अभियानाची” मतदार संघात प्रभावी अंमलबजावणी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे “मोदी@9 महा- जनसंपर्क अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत टिफिन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीसाठी “मोदी@9महा-जनसंपर्क अभियान” राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत समीर लॉन्स, रावेत येथे “टिफिन बैठक” आयोजित करण्यात आली.

भाजपा निमंत्रित सदस्य तथा माजी नगरसेवक शंकर जगताप याच्या पुढाकाराने ही “टिफिन बैठक” घेण्यात आली. यावेळी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजपा अजित कुलथे, शहराध्यक्ष सांस्कृतिक आघाडी भाजपा धनंजय शाळीग्राम , चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मंडलअध्यक्ष योगेश चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, सुरेश भोईर, संतोष कांबळे, सागर आंघोळकर, विनायक गायकवाड, सिद्धेश्वर बारणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नीता पाडळे, मोनाताई कुलकर्णी, मनीषा पवार, आरतीताई चोंधे, उषा मुंढे, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, महेश जगताप, संदीप नखाते, गोपाळ माळेकर, संदीप गाडे, विठ्ठल भोईर, विभिषण चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, रवींद्र देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, कुंदा भिसे, कविता दळवी, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, तानाजी बारणे, गणेश कस्पटे, नवनाथ ढवळे, सखाराम रेडेकर, संतोष ढोरे, सखाराम नखाते, सनी बारणे, अजय दूधभाते, शिवाजी कदम, संजय भिसे, राहुल जवळकर प्रमोद पवार, प्रकाश लोहार, आप्पा ठाकर, कैलास सानप, दिलीप तनपुरे, प्रसाद कस्पटे, दिगंबर गुजर, रणजित कलाटे, दीपक भोंडवे, रमेश काशीद, जवाहर ढोरे, युवराज ढोरे, संकेत कुटे, सरचिटणीस चिंचवड किवळे मंडल रवींद्र प्रभुणे तसेच भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, पेज प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना व महत्त्वाकांक्षी निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यानिमित्ताने केला आहे. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त शाल आणि पुस्तक देऊन अभिष्टचिंतन केले. ती बैठक अत्यंत आपुलकीची आणि उत्साहाची झाली.अशी माहिती शंकर जगताप, निमंत्रित सदस्य तथा माजी नगरसेवक, भाजपा यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments