Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीसंतपीठाच्या माध्यमातून महेश दादांनी युवा पिढीला दिशा देण्याचे  काम केले - कविता...

संतपीठाच्या माध्यमातून महेश दादांनी युवा पिढीला दिशा देण्याचे  काम केले – कविता आल्हाट यांचे प्रतिपादन

संतांच्या भूमीत संतपीठाच्या माध्यमातून आमदार महेशदादा लांडगे यांनी युवा पिढीला दिशा देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी केले. 

      आल्हाट यांनी म्हटले आहे की, आमदार महेशदादा लांडगे यांच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भोसरी मतदारसंघाचा अधिक चांगला विकास झाला. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र आळंदी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र देहू याच्या मध्यभागी मोशी, चिखली वसले आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी चिखली येथे संतपीठाच्या स्थापनेची संकल्पना मांडली आणि ती पूर्णत्वास नेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी माध्यमातून संत पीठात तरुण पिढीला संत साहित्याची आवड निर्माण केली जात आहे. त्यातून तरुण पिढीवर चांगले संस्कार होत आहेत. आपली संस्कृती परंपरा टिकविण्याचे काम होत आहे यातून युवा पिढीला दिशा देण्याचे काम आमदार महेशदादा लांडगे यांनी केले आहे.

  मी कबड्डीपटू आहे. तर आमदार महेशदादा लांडगे यांचे कुस्तीत योगदान आहे. कबड्डी मध्ये मातीशी नाळ असते. पटांगणावर जात असताना पाया पडून मी आहे हे सांगावे लागते. तर कुस्तीमध्ये दंड आणि मांडी थोपटावी लागते व मी मैदानात आहे हे सांगावे लागते. असे प्रतिपादन करत व अन्य कोणाचेही नाव न घेता कविता आल्हाट यांनी टोला लगावला. 

    मी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला अध्यक्ष या नात्याने महायुतीत युती धर्म पाळण्याचे आवाहन सर्वांना करत आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना तळागाळातील नागरिक, वंचित घटक, महिला यांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण झाले असून महिला  महायुतीशी कनेक्ट झाल्या आहेत. लाडक्या बहिणींची मोठी ताकद महायुतीच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे भोसरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार महेश दादा लांडगे हे निश्चित विजयी होतील. व तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास आल्हाट यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments