Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमीमहावीर जयंती निमित्त उपस्थित हजारो जैन बांधवांचा १०० टक्के मतदानाचा निर्धार

महावीर जयंती निमित्त उपस्थित हजारो जैन बांधवांचा १०० टक्के मतदानाचा निर्धार

संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांतीचा अनमोल संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांची बंधूभावाची शिकवण सर्वांनी जोपासावी त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वांनी येणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्कही बजवून लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उमेश पाटील यांनी केले.

 महावीर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण प्रेक्षागृह येथे विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक,जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक पगारिया तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

यावेळी उपस्थित हजारो बंधू-भगिनींनी “लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखून निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.

पिंपरी विधानसभा कार्यायालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत या कार्यक्रमात प्रफुल्ल पुराणिक यांनी सर्वांना मतदान करणेबाबत शपथ दिली तसेच लोकसभा निवडणूक प्रक्रियेबाबत माहितीही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments