Saturday, May 25, 2024
Homeगुन्हेगारीप्रशासनाची फसवणूक करून भरती झाल्याल्या महानगरपालिकेतील ‘त्या’ चार अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार…?

प्रशासनाची फसवणूक करून भरती झाल्याल्या महानगरपालिकेतील ‘त्या’ चार अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार…?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका एकेकाळी सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जायची. आज ही महानगरपालिका तितकीच श्रीमंत आहे, असे म्हणायला हरकत नाही. याच महानगरपालिकेत चार अतिवरीष्ठ अधिकारी प्रशासनाची फसवणूक करून भरती झाल्याचे प्रकरण उजेडात येत आहे. याबाबतचा अहवालदेखील विधानसभा उपाध्यक्ष यांनी मागवला आहे. आरटीआय कार्यकर्त्याने याबाबतचे तक्रार पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले होते. याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेचे (प्रशासन) उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत प्रशासनाची दिशाभूल करून चारजणांनी महानगरपालिकेत नोकरी मिळवली. ही बाब आरटीआय कार्यकर्त्याने उजेडात आणली आहे. ते चारजण आज मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांच्यावर महानगरपालिका अधिकारी मेहरबानी दाखवत असल्याचे बोलले जात आहे, त्यांना ते पाठीशी घालत आहेत. १४ मार्चला अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी अहवाल मागवला असून, चौकशी होणार आहे. नियमांची ऐसीतैशी करून हे चारजण भरती झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि फसवणूक करून भरती झालेल्या त्या चारजणांना वेगळा न्याय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणावर महानगरपालिकेचे प्रशासन उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, विधानसभा उपाध्यक्षाकडे तक्रारदाराने अर्ज केला होता. त्याचा अहवाल आम्हाला विधानसभा उपाध्यक्षांनी मागितला. अतिरिक्त आयुक्त आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. विधानसभा उपाध्यक्षांनी आणखी काही कागदपत्रे मागितली आहेत. आम्ही पुन्हा १४ तारखेला जाणार आहोत. आमचं म्हणणं आम्ही त्यांच्याकडे मांडत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments