Friday, July 19, 2024
Homeताजी बातमीयंदाचा स्वरसागर पुरस्कार ज्येष्ठ नर्तक पं. नंदकिशोर कपोते यांना जाहीर

यंदाचा स्वरसागर पुरस्कार ज्येष्ठ नर्तक पं. नंदकिशोर कपोते यांना जाहीर

पिंपरी चिंचवडची सांस्कृतिक परंपरा जोपासणारा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव शनिवारपासून सुरु होत आहे. त्यानिमित्ताने देण्यात येणारा यंदाचा स्वरसागर पुरस्कार ज्येष्ठ कथक नर्तक पं. नंदकिशोर कपोते यांना शनिवारी(12 ऑगस्ट ) सायंकाळी सात वाजता प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे समन्वयक प्रवीण तुपे यांनी दिली.

तसेच चित्रपटातील पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गायिका सावनी रवींद्र हिचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

याशिवाय युवा गायक ऋतुराज कोळपे याला पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने गायन, वादन, नृत्य क्षेत्रातील नामवंतांना स्वरसागर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. याआधी डॉ. प्रभा अत्रे, उ.झाकीर हुसेन, पं. विजय घाटे, पं. अनिंदो चटर्जी यासारख्या नामवंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments