Sunday, September 8, 2024
Homeताजी बातमीयंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन असणार- पंकजा मुंडे

यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन असणार- पंकजा मुंडे

२२ ऑक्टोबर २०२०,
दरवर्षी भगवानगडाच्या पायथ्याशी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भव्य असा दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा वेगळ्या प्रकारे दसरा मेळावा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ अपलोड करून सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाची सूचना केली आहे.

दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती आपण पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम करायचा आहे’, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले.

‘माझा मेळावा कसा होणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी कालच मराठवाड्याचा दौरा केला. तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. आपल्या दसऱ्या मेळाव्याला दरवर्षी लाखोंची गर्दी जमा होत असते. सावरगाव इथं लाखो कार्यकर्ते हे भगवानगडावर जमा होत असता, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे, असंही पंकजा मुंडेंनी सांगितले.

त्याचबरोबर, मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments