Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीया नविन वर्षात ‘तारीख नीट लिहा’ म्हणत नववर्षाचे स्वागत

या नविन वर्षात ‘तारीख नीट लिहा’ म्हणत नववर्षाचे स्वागत

१ जानेवारी २०२०,
नववर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या आतषबाजीचे क्षण मोबाइलमध्ये टिपताना, ‘आगामी वर्षामध्ये दिनांक लिहिताना पूर्ण स्वरूपात लिहा… नाहीतर घोळ होईल’ या आशयाचे संदेश फॉरवर्ड करत अब्जावधी नागरिक २०२० सालात प्रवेशकर्ते झाले आहेत. जगभरात जल्लोषात नववर्षाचे स्वागत होत असताना, ‘हॅप्पी न्यू इअर’ म्हणत मुंबईकरांनीही दांडग्या उत्साहात सरत्या वर्षाला निरोप दिला. रेल्वेसह बेस्टच्या विशेष फेऱ्या, मुंबई पोलिसांचा ‘चा‌ळीस हजारी’ बंदोबस्त, समुद्रकिनारे आणि चौपाट्यांवर खास वाहतुकीचे नियमन अशा खास बंदोबस्तात मंगळवारी, मध्यरात्री मुंबईकरांनी नववर्षाचे स्वागत केले.

आपल्या काही तास पुढे असलेल्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये इंग्रजी नववर्षाच्या स्वागताचे फोटो पाहत, संध्याकाळपासूनच मुंबईकरांनी मरिन ड्राइव्हसह दादर, जुहू, गिरगाव चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया आदी ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. या गर्दीमध्ये उपनगरांकडून मुंबई शहराच्या दिशेने निघालेली कुटुंबे, मित्रमंडळी, भावंडांचे ग्रुप्स यांचा समावेश होता. सरत्या वर्षातील कटू आठवणी मागे सारत नव्या वर्षात पाऊल ठेवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सेलिब्रेशनचा मूड होता. गर्दीमध्ये बच्चेकंपनी हरवू नये,यासाठी फॅमिली ड्रेसकोड, आगगाडीसारखी एकच रांग अशा क्लृप्त्या अनेकांनी लढवल्या होत्या. पहिल्यांदाच मरिन ड्राइव्हकडे वळलेल्या अनेक नवख्या मंडळींनी तुफान गर्दी पाहून ‘दूरूनच सेलिब्रेशन साजरे’ म्हणत परतीची वाट पकडली होती. फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली असली, तरी नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्य घेत, अनेक ठिकाणी या नियमाला बगल देण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक वर्द‌ळ असलेल्या रस्त्यांवर वाहने तसेच घोळक्यांना थांबण्यास सक्तीची मनाई करण्यात येत होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments