Tuesday, April 22, 2025
Homeताजी बातमी'मुळशी पॅटर्न' चा हिंदी रिमेक 'अंतिम : द फायनल ट्रुथ' मध्ये हि...

‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी रिमेक ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ मध्ये हि ” राहुल्या ” आयुष शर्माने शेअर केला फोटो

४ फेब्रुवारी २०२१,
मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाचा हा हिंदी रिमेक ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, कारण सलमान खान आणि आयुष शर्मा हे कलाकार या सिनेमात एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ असेल. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयुष शर्माच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहेत. त्याचा या चित्रपटातील लुक नुकताच समोर आला आहे. चित्रपटाच्या सेटमधील आयुष शर्माने स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयुष वेगळ्या लूकमध्ये दिसतोय. आयुषने या फोटोच्या माध्यामातून त्याची भूमिका किती दमदार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये ‘राहुल्या’ असं लिहिलंय.

https://www.instagram.com/aaysharma/?utm_source=ig_embed

सिनेमात आयुषचं नाव राहुल असेल हे यावरून स्पष्ट होतंय. ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. मराठीत नायकाचं असलेलं नाव हिंदीत देखील कायम ठेवण्यात आलं आहे. सलमान खान सिनेमात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments