पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे.
आरोपीने जेव्हा पीडित तरुणीवर कोयत्याने हल्ला केला, तेव्हा पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. या दोन्ही तरुणांचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या दोघांचं मनभरुन कौतुक केलं आहे. शिवाय दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुणे आहे, येथेच शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती,
आज पुण्यात घडलेल्या हल्ल्यात प्रसंगावधान दाखवत तरुणांनी त्या विकृतला पकडले आणी चांगला चोप देत पोलीसांच्या हवाली केले… ! कारण हि विकृती अशीच ठेचली पाहीजे..!
आपणही असे सजग राहून आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांवर लक्ष ठेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहीजे …!