आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाप्रभाग रचना प्रारूप आरखडा नुकताच जाहीर झाला. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसून आली आहेत. भारतीय जनता पक्षाला आठवडा भारत तिसरा धक्का बसला आहे. भाजपचे पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पिंपरतील भाजपला लागलेल्या गळतीबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामरामकरत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित…
भाजपचे पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील नगरसेवक पदाचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळं तुषार कामठे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फलक लावून कामठे यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर स्थानिक राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ह्या आधी भाजप च्या मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे, पिंपळे गुरव मधील चंदा लोखंडे आणि आता तुषार कामठे असे तीन धक्के सत्ताधारी भाजपला झाला आहे.


