Monday, May 12, 2025
Homeगुन्हेगारीपेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी थेट पाईपलाईनच फोडली….! साताऱ्यातील घटना

पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी थेट पाईपलाईनच फोडली….! साताऱ्यातील घटना

३ मार्च २०२१,
पेट्रोलने शंभरी गाठली आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. घरगुती गॅसच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागतेय. तर पेट्रोलची चोरुन विक्री करणाऱ्यांचं मात्र चांदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, पेट्रोल विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जाऊ लागला आहे. त्यासाठी आता पेट्रोलची चोरी होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ होत आहे. साताऱ्यात पेट्रोलची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी थेट पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईनच फोडली आहे.

मुंबई-पुणे-सोलापूर अशी जाणारी पाईपलाईन चोरट्यांनी फोडली आहे. साताऱ्यातील सासवड गावाजवळ या पाईपलाईनला मोठं भगदाड पाडण्यात आलं आहे. त्यामुळे हजारो लीटर पेट्रोल वाया गेलं. इतकंच नाही तर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याचा रंगही बदलला आहे. त्याचबरोबर शेतातील पिकांचंही पेट्रोलमुळे मोठं नुकसान झालं आहे. ही पाईपलाईन फोडल्यानंतर वेळीच अलार्म वाजल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments