Thursday, May 15, 2025
Homeअर्थविश्व' अर्थसंकल्प -२०२१' मधील 'या'आहेत महत्वाच्या घोषणा….

‘ अर्थसंकल्प -२०२१’ मधील ‘या’आहेत महत्वाच्या घोषणा….

२ फेब्रुवारी २०२१,
करोना संकटात केंद्र सरकारने आतापर्यंत आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध क्षेत्रांना मदत केली. पण अर्थव्यवस्था अजून रुळावर आलेली नाही. अर्थसंकल्पात केंद्र सरकाकडून महत्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली.

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला देशाचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प
    -२०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ या वर्षात अर्थसंकल्पाच्या भांडवली खर्चत १ लाख ४२ हजार कोटींची वाढ
  • आरोग्य आणि कल्याण, पायाभूत सेवा सुविधा, सर्वसामावेशक विकास, मनुष्यबळात नवजीवनाचा विचार,
    नवोन्मेष- संशोधन आणि विकास, किमान सरकार-कमाल शासन या सहा प्रमुख घटकांवर अर्थसंकल्पाची मांडणी
  • आरोग्य क्षेत्रासाठी २,२३,८४६ कोटींची तरतूद
  • करोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटी
  • प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेसाठी सहा वर्षात ६४ हजार १८० कोटी
  • ग्रामीण भागात १७७८८ आरोग्य कल्याण केंद्र तर शहरी भागात ११०२४ आरोग्य केंद्र उभारणार
    -शहरी जलजीवन मिशनसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद
  • २ कोटी ८६ लाख कुटुंबाना नळाद्वारे पाणी पुरवठा करणार
  • स्वच्छ भारत मिशनसाठी पाच वर्षात १ लाख ४१ हजार ६८७ कोटींची तरतूद
  • वायू प्रदूषण रोखण्यासाठी ४२ शहरी केंद्रांसाठी २२१७ कोटी
  • जुन्या वाहनासाठी वाहन स्क्रॅप धोरण जाहीर
  • खासगी वाहनांची २० वर्षांनंतर आणि व्यावसायिक वाहनांची १५ वर्षानंतर फिटनेस चाचणी
  • तीन वर्षात देशात सात नवे टेक्सटाईल्स पार्क
  • रस्ते आणि महामार्ग निर्मितीसाठी १ लाख १८ हजार १०१ कोटी
  • तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये आर्थिक काॅरिडोर
  • दिल्ली-मुंबई ,बंगळुरू-चेन्नई, कानपुर-लखनऊ एक्सप्रेस वे सह आणखी पाच महामार्गांच्या कामासाठी मोठी तरतूद
  • रेल्वेच्या विकासासाठी १ लक्ष ७ हजार १०० कोटी
  • महानगरांमधील परिवहन सेवेसाठी २७ शहरांकरिता १०१६ किमीच्या मेट्रो मार्गांना मंजुरी, शहरात बस सेवा सुरु करणार
  • उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थ्यांना सामावून घेणार
  • पुढील तीन वर्षात १०० जिल्ह्यांमध्ये शहरी गॅस वितरण प्रणाली
  • विमा क्षेत्रात ७४ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता
  • सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण
  • भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी भांडवली बाजारात सूचिबद्ध करणार
  • बीपीएसीएल, एअर इंडियासह सहा सार्वजनिक कंपन्यांमधील हिस्सा विक्री पूर्ण करण्याचे उद्धिष्ट
  • शेतमालाला दीडपट हमी भावाची घोषणा
  • ग्रामीण विकासासाठी ४० हजार कोटीची तरतूद
  • वन नेशन वन कार्ड योजना उर्वरित चार राज्यांत राबवणार
  • १०० नव्या सैनिकी शाळा
  • आदिवासी क्षेत्रात ७५० एकलव्य शाळा
  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरण पत्र सादर करण्यापासून सूट
  • डिजिटल देवाणघेवाण करणाऱ्या कंपन्यांची लेख परिक्षणाची मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी केली
  • परवडणाऱ्या घरांच्या कर्जावरील व्याज सूट आणखी एक वर्ष मिळणार
  • परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांना कर सवलत
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments