Monday, October 7, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक सभांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील ‘ही’ ६६ ठिकाणे निश्चित

लोकसभा निवडणूक सभांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील ‘ही’ ६६ ठिकाणे निश्चित

लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाहीत. निश्चित केलेल्या जागेवर सभा घेण्यासाठी पक्षांना किंवा उमेदवारांना क्षेत्रीय कार्यालयांकडे अर्ज करावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्यासाठी महापालिकेने मैदान व मोकळ्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागेत सभा घेता येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यामागील मोकळी जागा, आकुर्डीतील खंडोबा मंदिराशेजारील जागा, प्राधिकरणातील संजय काळे क्रीडांगण, नियोजित महापौर निवासस्थानाची मोकळी जागा, मदनलाल धिंग्रा मैदान, शाहूनगर येथील राजर्षी शाहू महाराज मैदान अशी ठिकाणे आहेत. मोरया गोसावी मंदिराशेजारील मैदान यासह भोसरीतील पीएमटी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील चौक, चऱ्होली बैलगाडा घाट, मोशीतील शिवाजी महाराज पुतळा चौक, दिघी जुना जकातनाका चौक, डुडुळगाव, बोपखेल गावठाण, भोसरीतील तळ्याजवळील मैदान, पिंपळे गुरव येथील मोकळी जागा, सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान ही ठिकाणे सभेसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

कासारवाडीतील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील चार, निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील म्हेत्रे मैदान हे एकमेव ठिकाण आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील दोन तर राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक ३४ अशी ६६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

सभांसाठी ६६ ठिकाणे निश्चित केली आहेत. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली असल्याचे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments