Tuesday, January 13, 2026
Homeआरोग्यविषयकभाजप काळात शहरात विकास नाही, फक्त भ्रष्टाचार वाढला – अजित पवारांची घणाघाती...

भाजप काळात शहरात विकास नाही, फक्त भ्रष्टाचार वाढला – अजित पवारांची घणाघाती टीका

वाल्हेकरवाडीतील अनाधिकृत घरांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आश्वासन

प्रभाग १६, १७ आणि १८ साठी संयुक्त विजय संकल्प सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती

पिंपरी, दि. (प्रतिनिधी) –
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कारभारात गेल्या काही वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचाराचा आकडा सपाट वाढवणारेच सध्या सत्तेत आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाल्हेकरवाडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

या वेळी प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी संयुक्त ‘विजय संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

अजित पवार म्हणाले की,
“पिंपरी-चिंचवड शहरात विकासाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. कष्टकरी, झोपडपट्टीधारक आणि मध्यमवर्गीय नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागला.”

ते पुढे म्हणाले,
“यापुढे शहरातील कोणत्याही घरांवर अन्यायकारकपणे बुलडोझर फिरू दिला जाणार नाही. वाल्हेकरवाडी व परिसरातील नागरिकांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांच्या घरांचा हक्क सुरक्षित केला जाईल. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही.”

भाजपवर टीका करताना अजित पवार यांनी सांगितले की,
“भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. शहराचा कारभार काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी चालवण्यात आला. आता नागरिकांनी या कारभाराला थांबवण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचाराचा आकडा वाढवणाऱ्यांनी आज विकासाच्या गप्पा मारू नयेत. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, शहराची लूट करणारे आणि जनतेला फसवणाऱ्यांना माफी नाही. जनता या निवडणुकीत त्यांना योग्य धडा शिकवेल.”

या सभेला प्रभाग १६, १७ आणि १८ मधील उमेदवार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments