Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकदेशात लसीची तुटवडा नाही, गरजेनुसार पुरवठा करत आहोत – डॉ. हर्षवर्धन

देशात लसीची तुटवडा नाही, गरजेनुसार पुरवठा करत आहोत – डॉ. हर्षवर्धन

देशातील कोणत्याही भागात करोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. मंगळवारी हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते.

केंद्र सरकार सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. “गेल्या दोन महिन्यात देशातील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. अॅक्टिव्ह रुग्संख्या कमी असून रिकव्हरी रेट ९२.३८ आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील मृत्यूदर १.३० टक्के आहे,” अशी माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.

“आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे, एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटतं सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेलं धोरण आपण नीट राबवलं तर संख्या कमी होईल,” असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सर्व गोष्टी पुन्हा सुरु झाल्या असून लोकांचं निष्काळजी वागणं मोठी चिंतेची बाब असल्याचं यावेळी ते म्हणाले.

“महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लशींचा पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत,” अशी मागणी यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments