Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीतक्रार मागे न घेतल्याने तरुणाला भररस्त्यात भोसकले

तक्रार मागे न घेतल्याने तरुणाला भररस्त्यात भोसकले

३१ ऑक्टोबर २०२०,
पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेत नसल्याने एका तरुणाच्या छातीत चाकू भोसकून खुनाचा प्रयत्न केला. गुजरवाडी येथील खोपडेनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विशाल उर्फ मोन्या फाटे ( रा. कात्रज गाव) या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आकाश राजू पाटणकर ( वय २३, रा. खोपडेनगर ) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आकाश हा दुचाकीवरून जात होता. त्याला विशालने रस्त्यात अडवले. यानंतर ‘तुला लय माज आलाय का?’, असे म्हणत त्याच्या छातीत चाकू खुपसला. या घटनेत आकाश गंभीर जखमी झाला आहे.

विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने २०१७ मध्ये आकाशवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. यावेळी आकाशने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी विशालने त्याच्यामागे तगादा लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान मचाले करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments