प्रभाग क्रमांक १७ मध्ये राजकीय वातावरण झपाट्याने बदलताना दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट लाट निर्माण झाली आहे. विरोधकांची हवा गलितगात्र होत असताना वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर आणि दळवीनगर परिसरात नागरिकांचा वाढता कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेला दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला विश्वास आणि स्थानिक उमेदवारांचा प्रभागाशी असलेला थेट, सातत्यपूर्ण संपर्क यामुळे यावेळी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ठाम पाठिंबा दिल्याचे चित्र आहे. प्रचारादरम्यान घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेणे, गल्लोगल्ली बैठका घेणे आणि तात्काळ उपाययोजनांबाबत सकारात्मक भूमिका मांडणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची प्रभावी प्रचारशैली ठरत आहे.
नुकतीच वाल्हेकरवाडी येथे पार पडलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची ठोस ग्वाही दिली. तसेच परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला कडक तंबी देत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
सर्वसमावेशक नेतृत्व, विश्वासार्ह विकास आणि सक्षम प्रतिनिधित्वासाठी प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी, बिजलीनगर आणि दळवीनगरच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये
अ–(१) मनिषा राजेश आरसुळ,
ब–(४) भाऊसाहेब सोपानराव भोईर,
क–(४) शोभा तानाजी वाल्हेकर आणि
ड–(१) शेखर बबन चिंचवडे
यांचा समावेश असून या संपूर्ण पॅनलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नियमितीकरण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली ठोस व परिणामकारक भूमिका नागरिकांना भावत आहे. महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांकडील आरोप-प्रत्यारोपांचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
विकास, विश्वास आणि मजबूत नेतृत्वाच्या जोरावर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास नागरिक आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी नागरिकांची पहिली पसंती राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याचे स्पष्ट होत आहे.


