पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित १९ वर्षाखालील मुलींच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर आज शानदार सुरुवात झाली, स्पर्धेचे उदघाटन माजी क्रिकेटपटू व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समिती सदस्या मनीषा कोल्हटकर ह्यांच्या हस्ते पार पडले, मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत आणि शिस्तबद्ध वर्तणूकिसह आपले पाय जमिनीवर राहायला हवेत,,,
ह्या प्रसंगी अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख, चंदन गंगावणे, भूषण सूर्यवंशी व डॉ.विजय पाटील उपस्थित होते, स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील अकॅडमीच्या मैदानावर होणार आहेत,,,
आजचे दोन साखळी सामने हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमी पराभूत विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी यांच्या झाला यामध्ये सामनावीर मैथिली गांजाळे
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी पीवायसी विजयी विरुद्ध पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन सामनावीर प्रणया पोहेकर पीवायसी असे झाले.