१६ मार्च २०२१,
पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित 13 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर आज शानदार सुरुवात झाली, स्पर्धेचे उदघाटन सॉफ्टग्रीप इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री बालाजी मुत्तेपवार ह्यांच्या हस्ते पार पडले, ह्या प्रसंगी अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख, भूषण सुर्यवंशी आणि डॉ.विजय पाटील उपस्थित होते,
या स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील अकॅडमीच्या मैदानावर होणार आहेत,,,
सकाळच्या सत्रातील दोन साखळी सामन्यात साईरंग फौंडेशन लक्ष क्रिकेट अकॅडमी पराभूत झाले असून व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीने विजय मिळवला आहे यामध्ये सामनावीर ठरला वरद छत्तर तो वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू आहे.

तसेच दुसरया सामन्यात स्पोर्ट्स पार्क अकॅडमी पराभूत झाले असून चोंधेपाटील क्रिकेट अकॅडमी विजयी झाले आहेत, यामध्ये सामनावीर आयुष चिटणीस ठरलं असून तो चोंधेपाटील अकॅडमीचा खेळाडू आहे.
