पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने महिला खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 19 वर्षाखालील मुलींच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १३ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह पुढील संघ सहभागी होणार आहेत, पीवायसी, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, वॉरिअर्स क्रिकेट अकॅडमी, हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमी, कोल्हापूर शाहूपुरी जिमखाना, आदित्य काळे स्पोर्ट्स अकॅडमी, पुणें जिल्हा क्रिकेट असोसिएशन, अशा नामांकित आठ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे,
सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळच्या सत्रात दोन उपांत्य सामने होतील अंतिम सामना २० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी होईल, थेरगाव येथील मैदानावर १७ डिसेंबर २०२१ रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल.
स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील, प्रत्येक सामना२० षटकांचा असतील, प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल पारितोषिक वितरण २० डिसेंबर २०२१ रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल.