पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून १७ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ डिसेंबर ते २० जानेवारी २०२२ या दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह खालील संघ सहभागी होणार आहेत. एच के बाऊन्स अकॅडमी, पीवायसी, डेक्कन जिमखाना, वीरांगण क्रिकेट अकॅडमी,परंडवाल क्रिकेट अकॅडमी
ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी, आर्यन्स क्रिकेटअकॅडमी अशा नामांकित आठ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील, अंतिम सामना २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी होईल, थेरगाव येथील मैदानावर २८ डिसेंबर २०२१ रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील. प्रत्येक सामना ४५ षटकांचा असेल,प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल.पारितोषिक वितरण २० जानेवारी २०२२ रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल.