Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वराज्यात लवकरच कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, अनावश्यक सेवा, लोकल प्रवास, दुकानांच्या वेळा…

राज्यात लवकरच कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, अनावश्यक सेवा, लोकल प्रवास, दुकानांच्या वेळा…

मुंबईसह महाराष्ट्रात करोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल, बुधवारी करोना रुग्णांची संख्या २६ हजारांपार नोंदवली गेली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता राज्यात लवकरच कठोर निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन निर्बंधांसंबंधी आज, गुरुवारी महत्वाची बैठक होऊ शकते आणि त्यात काही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात बुधवारी करोनाचे २६, ५३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनाचे १५,१६६ रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा ४३.७१ टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मुंबईसह महाराष्ट्रातील करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधांबाबत आज, गुरुवारी महत्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. यात कार्यालयीन उपस्थिती आणि दुकाने, रेस्तराँच्या वेळांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबतही काही निर्णय घेतला जाऊ शकतो. करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता, लवकरच नवीन कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात, यात काहीच शंका नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव वाढतोय…
मुंबईत बुधवारी सर्वाधिक १०० ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर नागपुरात ११, ठाणे महापालिका आणि पुणे महापालिका क्षेत्रात ७, पिंपरी- चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २, पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १ असे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७९७ ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments