Saturday, March 2, 2024
Homeगुन्हेगारीवाकड परिसरात स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने केला पर्दाफाश

वाकड परिसरात स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने केला पर्दाफाश

१ ऑक्टोबर २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. वाकड परिसरात स्पा सेंटरमधील देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागाने तीन महिलांची सुटका केली. वाकडमधील इवंटी स्पा सेंटरमध्ये हा प्रकार सुरु होता.

याआधीही पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींची सुटका करण्यात आली होती. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना आणि त्यांच्याकडून व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments