भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या पाच गावांचा समावेश असणारी पिंपरी चिंचवड नगरपालिका दिवंगत खासदार आण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. पिंपरी चिंचवड ची ओळख औद्योगिक नगरी, कामगार नगरी सोबतच आता सांस्कृतिक नागरी म्हणून उदयास येत आहे , पिंपरी चिंचवड शहराला स्वतःची सांस्कृतिक ओळख नाही आजपण शहरात सांस्कृतिक क्षेत्राला पोषक वातावरण नाही परंतु अशा परिस्थितीत हि काही कलाकार आहेत जे आज हि पिंपरी चिंचवड शहराला नवी सांस्कृतिक ओळख देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत त्यापैकी एक म्हणजे डॉ. संजीवकुमार शंकरराव पाटील त्यांच्या या सांस्कृतिक कार्याचे कौतुक करण्यासाठी ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) हा पुरस्कार उद्या गुरुवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. संजीवकुमार शंकरराव पाटील यांनी बी.जे.मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमधुन एम.बी.बी.एस.आणि भुलतज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे, भुलतज्ञ म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात १९९७ पासून एकूण २२ वर्षे काम केले आहे. भुलतज्ञ आणि मनशक्ती वक्ते हीच त्यांची ओळख नसून, ते एक अभिनेते,दिग्दर्शक आणि निर्माते आहेत, तसेच त्यांनी काही मोजक्या नाटकांचं आणि काही शॉर्ट फिल्म्स चं लेखन सुद्धा केलं आहे, अथर्व थिएटर्स पुणे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, अथर्व तर्फे त्यांनी २००१ पासून मोरूची मावशी,शांतेचे कार्ट चालू आहे,तो मी नव्हेच, काका की काकू,बॅरिस्टर, विच्छा माझी पुरी करा,तरुण तुर्क म्हातारे अर्क,नट नावाचं नाटक,ब्राझीलचा ज्योतिषी आणि चिनी पोपट, तुम्हारा इंतजार है, आणि नटसम्राट अश्या असंख्य नाटकाचं दिग्दर्शन आणि ह्यातली मुख्य भूमिका सुद्धा सादर केली आहे, स्वतःच्या संस्थे शिवाय पुण्यातील इतर संस्थेच्या,ब्लाइंड गेम, गाठीभेटी, क्लीनबोल्ड अश्या मोजक्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत.
१९८८ पासून महाविद्यालयीन काळापासून ते आतापर्यंत जवळजवळ ३४ वर्ष ते रंगभूमीवर काम करत आहेत.जवळजवळ सगळी मिळून १००० पर्यंत प्रयोग केले आहेत. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धेतील बक्षिसे, महाराष्ट्र शासन आयोजित राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोकृष्ट अभिनयासाठी प्रमाणपत्रे आणि सर्वोच्च असं रौप्य पदक सुद्धा त्यांना मिळालं आहे, अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे दोन वेळा ,पिंपरी चिंचवड शाखेतर्फे एक वेळा पुरस्कार मिळाला आहे, कलारंग पुरस्कार, नटराज प्रतिष्ठान पुरस्कार, आणि सर्वात मानाचा सासवड च्या अत्रे प्रतिष्ठान चा आचार्य अत्रे पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे,
२००८ साली त्यांनी एकाच दिवसात सकाळी ९ वाजेपासून ते रात्री १२ पर्यंत सलग ४ वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग सादर करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये राष्ट्रीय रेकॉर्ड म्हणून नाव नोंदवलं आहे,ह्या सगळ्या नाटकांचे दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रमुख भूमिका त्यांनी साकारली होती. ह्याच बरोबर त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात तसेच हिंदी चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती ह्या मध्ये काम केले आहे, मराठी मालिका :- सध्याच्या मालिका :-तुमची मुलगी काय करते? पिंकीचा विजय असो, मागील मालिका :-तुझ्यात जीव रंगला,रंग माझा वेगळा,असंभव, अस्मिता,लक्ष,अहिल्याबाई होळकर,अवघाची संसार, वादळवाट,चार दिवस सासूचे, भाग्य विधाता ,शौर्य, पंखांची सावली,तुझ्या विना,अनुपमा, गोष्ट एका आनंदीची,आणि अनेक…
हिंदी मालिका:- तारक मेहता का उलटा चष्मा,मेरे साई,
मराठी चित्रपट:- सोयरीक, येड्यांची जत्रा, बाबू बँड बाजा,साने गुरुजी,खेळ सातबाराचा, सातबारा कसा बदलला?, श्री पार्टनर, पकडपकडी,सत्य,आई नंबर वन आणि अनेक… आगामी चित्रपट:- जननी, राऊंदळ,आपडी थापडी, मॅड. हिंदी चित्रपट :- बदलापूर, बुधीयासिंग बोर्न टू रन,ब्ल्यू जीन ब्ल्यूज इत्यादी. हिंदी वेबसिरीज :- मॉम अँड को.,बेकाबू 2, आगामी सिरीज:- गिल्टी माइन्ड्स, मुरशिद. शॉर्ट फिल्म्स :- पाऊस,माणूस, हापूस, जासुस, न मावळणारा सूर्य, तूच माझी आई, मिठा पान, मी अखेरचा मरतो तेव्हा, अतृप्त, ठिकऱ्या, तिच्या आईची, संत कडोजी महाराज, सप्तश्रृंगी माता,भद्रा मारुती, तुळजा भवानी माता,
जाहिराती:- बांगुर सिमेंट,E Pluto स्कुटर, जिविका ड्रिंकिंग वॉटर,ग्राम बीजोत्पादन , बिर्ला हॉस्पिटल,कुबेरा टायर सील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेट फिल्म, गव्हर्नमेंट कॉर्पोरेट फिल्म, थरमॅक्स कॉर्पोरेट फिल्म…इत्यादी..
दरम्यान पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कार्यक्रमाची माहिती ” पिंपरी चिंचवड सन्मान” ‘सन्मान कार्याचा – गौरव शहराचा’ कोठे पार पडणार, स्थळ ;- ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड पुणे -१९ दिनांक आणि वेळ गुरुवार ७ एप्रिल २०२२, सायंकाळी ५ वाजता..