Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वशेअर बाजार गडगडला… सेन्सेक्स ३०० अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगडला… सेन्सेक्स ३०० अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी घसरला

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले.सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळला आहे तर, निफ्टी १०० अंकांनी खाली घसरलानिफ्टी १०० अंकांनी खाली घसरला आहे. मागील तीन दिवसात सेन्सेक्स १८०० हून अधिक अंकांनी गडगडला आहे. इतकेच नाही तर, मागील तीन दिवसात ६.५६ लाख कोटींचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. भारतीय बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन सुरु असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोबतच जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव आणि तेलाच्या किमतीत होत असलेल्या वाढीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी सकाळी शेअर बाजार तोट्याने उघडला. सेन्सेक्स व्यापाराच्या सुरुवातीच्या मिनिटांत ७०० अंक किंवा १.२५ मी टक्क्यांपेक्षा जास्त घसरून ५८,७०० च्या जवळ आला तर NSE निफ्टी १७५५० च्या खाली घसरला होता. बँक निफ्टी १. ६ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. पॉवर ग्रिड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर हे दोनच शेअर्स सेन्सेक्समध्ये वाढले. बजाज फिनसर्व्ह 3 टक्क्यांनी टॉप ड्रॅग म्हणून खाली आले, त्यानंतरच्या क्रमांकांवर टेक महिंद्रा आणि डॉ रेड्डीजचे शेअर होते.

महागाईचा भडका उडाल्याने शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात गडगडला आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि इंधन दरवाढीचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळतेय. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ८८ डॉलर इतका आहे. वाढत्या महागाईमुळे बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments