Wednesday, January 22, 2025
Homeताजी बातमीमावळ लोकसभा मतदानासाठी एम्पायर स्क्वेअर या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ

मावळ लोकसभा मतदानासाठी एम्पायर स्क्वेअर या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ

“निवडणुका म्हणजे लोकशाहीचा भव्य उत्सव” आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी उत्सुक आहोत. त्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकीतून गेले दोन महिने शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक व मित्रपरिवारांमध्ये मतदान जनजागृती करीत आहोत असे प्रतिपादन एम्पायर स्क्वेअर मधील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सदानंद बोगम यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील  सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती मोहीम राबवली जात असून आज चिंचवड स्टेशन येथे एम्पायर स्क्वेअर या ७५० सदनिका असलेल्या सोसायटीत मतदानाची शपथ घेऊन जनजागृती करण्यात आली,त्यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बोगम हे बोलत होते.

यावेळी पिंपरी विधानसभा कार्यालयाचे नोडल अधिकारी मुकेश कोळप, महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,नोडल पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे,महालिंग मुळे, दिनेश जगताप,महिला मतदार, सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे,तसेच जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक उपस्थित होते.

अध्यक्ष बोगम म्हणाले आमच्या सोसायटीत सभासदांच्या सहकार्यातून नवीन १२०० मतदारांची नोंदणी करून घेतली आहे, सोसायटीमध्ये ७५० सदनिका असून ४ हजाराच्या जवळपास नागरिक येथे वास्तव्यास आहेत,आम्ही मतदान जनजागृतीसाठी प्लेक्स, पोस्टर देखील लावणार आहोत, “मतदान करा!!मतदान करा” या मजकुराचे टी-शर्टही आम्ही बनवून घेतलेले असून सोसायटीतील मतदान १०० टक्के होईल यासाठी प्रयास करणार आहोत असे सांगितले.तसेच सोसायटीतील मतदारांची मोठी संख्या विचारात घेऊन पुढील निवडणुकांसाठी या सोसायटीतच एक मतदान केंद्र निर्माण करावे असे मतही व्यक्त केले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ महिला मतदारांनी देखील सोसायटीतील सर्व महिला मतदारांचे मतदान होईल याकरीता आम्हीदेखील सोशल मिडीया तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे जनजागृती करणार असल्याचे सांगितले.

नोडल अधिकारी मुकेश कोळप यांनी लोकसभा निवडणुकी मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, प्रफुल्ल पुराणिक यांनी सर्व उपस्थितांना शासकीय मतदान मार्गदर्शिका वाटप केल्या तसेच मतदान करण्याबाबत शपथही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments