Saturday, September 30, 2023
Homeअर्थविश्वमुंबई पोलिसांचे पगार आता HDFC बँकेतून, या' सुविधा मिळणार

मुंबई पोलिसांचे पगार आता HDFC बँकेतून, या’ सुविधा मिळणार

२२ ऑक्टोबर २०२०,
मुंबई पोलिसांची वेतन खाती अॅक्सिस बँकेकडे वर्ग करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती एचडीएफसी बँकेत वळवण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि इतर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जातील.

अॅक्सिस बँकेचा एमओयू ३१ जुलैला संपल्यानंतर नवीन बँकेचे प्रस्ताव आले होते. यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्यानं या बँकेची निवड करण्यात आली असल्याची माहिती देण्यात येत आहे.

एचडीएफसीनं मुंबई पोलिसांना दिलेल्या सुविधा

नैसर्गिक किंवा करोनामुळं मृत्यू झाल्यास १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू झाल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच

अॅक्सिस बँक ही खाजगी असल्यामुळे सर्वानी विरोध केला आणि आता महाविकास आघाडी सुद्धा खाजगी बँकेला झुकते माप देत आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या बँकेत खाते उघडावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून अशा करारनामा करण्यापूर्वी सर्वांचे मत जाणून घेणे अपेक्षित आहे, असेही गलगली यांनी नमूद केले

अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच

अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी

रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन १ हजार रुपये मदत

दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून निर्दशनास आणून दिले आहे की, एचडीएफसी बँक ही खाजगी बँक आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी २१ ऑक्टोबर २०२० रोजी करारनामा केला आहे. मुंबई पोलिसांचा दावा आहे की सर्व प्रस्तावात एचडीएफसी बँकेचा प्रस्ताव अधिक फायदेशीर व त्यांनी देऊ केलेल्या सोयी सुविधा इतरांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आल्याने दिनांक २१ /१० /२०२० रोजी मुंबई पोलीस दलातील सर्व कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांचे वेतनाचे खाते उघडण्याकरीता एचडीएफसी बॅंकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments