शाळा म्हटले कि, डोळ्यासमोर उभा होतो वर्गातला धिंगाणा, खोड्या करणे, मारामारी आणि अखेरच्या बाकावर बसून समोरच्या बाकावर बसलेल्या मुलांना चॉकपीस मारणे अशा खोड्या सर्रासपणे शाळेत चालतात. त्यात एवढी मजा असायची कि जे मैदानी खेळातही नसायची. वर्ग म्हटला कि तुकडी आली, तुकडी म्हटले कि अ, ब , क आणि ड असे विभाग आले. वर्गात सुद्धा विद्यार्थ्यांचे विभाजन हुशार आणि ढ विद्यार्थी. त्यातही पहिल्या बाकावर कोण बसणार, मधल्या बाकावर कोण बसणार आणि अखेरच्या बाकावर कोण बसणार यातही विद्यार्थ्याची ऐपत पाहून निवडून घेतली जाणारी जागा.
समोरील बाकावर बसलेल्या मुलाच्या शर्टवर पाठीमागे वाटेल ते लिहिणे, रेषा ओढणे. बाकावर चिंगम खाऊन तिथेच ते चिटकून ठेवणे, त्यातल्या त्यात अ आणि ब तुकडीमध्ये चालणारी स्पर्धा आणि ती स्पर्धा पाहून येणारी अनोखी मजा. दरवर्षी शाळेत घेतली जाणारी गॅदरींग त्यात उत्साहाने सहभाग घेणारे अखेरच्या बाकावर बसणारे विद्यार्थी. आणि दाखवून देत कि आम्ही अभ्यासात हुशार नसलो तरी मंचावर उत्स्फूर्त कामगिरी करू शकतो. तर हुशार विद्यार्थी मात्र सूत्र संचालन करण्यात अग्रेसर. जिकडे बघा तिकडे बघायला मिळणारी ती सुंदर अशी स्पर्धा.शाळेत असताना विद्यार्थ्यांनी केलेली दंगामस्ती, मित्रांसोबतच्या गप्पा, शिक्षकांसोबत मजाक मस्ती, गप्पा-गोष्टी, या सर्व शालेयस्तरातील घडामोडींवर प्रकाशझोत टाकणारे मराठी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे,
ग्रोथ प्रोडक्शनने या अफलातून गाण्याची निर्मिती केलेली आहे. रवी वाघमारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या गीतामध्ये प्रिंस केदारी व समिक्षा झांबरे मुख्य भूमिकेत आहेत. दीपाली केदारी यांनी नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. तर चिन्मय जोग यांनी गायले आहे. संदीप पाठणकर यांनी संगीतबद्ध केले आहे. डिओपी महेश धेंडे यांची असून, प्रोडक्शन हेड साई काळे यांनी गीत लिहिले आहे.