चालकास मारहाण करून दोन तरूणांनी रिक्षा चोरून नेली आहे. आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात ही घटना घडली. इम्रान अब्दुलशिद शेख (वय-३५, रा. बोपोडी, पुणे) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख रिक्षा घेऊन आकुर्डीत आले होते. २० ते २५ वयोगटातील दोन अनोळखी तरूण त्यांचा पाठलाग करत खंडोबा माळ येथे आले. रिक्षा थांबवून त्यांनी शेख यांना खाली उतरवले आणि मारहाण केली. त्यांनतर रिक्षा निगडीच्या दिशेने चोरून नेली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.