Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीभोसरी विधानसभा अंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपन्न

भोसरी विधानसभा अंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपन्न

पुणे जिल्हाधिकारी यांचेकडील सर्वसाधारण शाखेच्या आदेशानुसार आमदार महेश लांडगे यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

आज त्यांच्या अध्यक्षतेखाली इ प्रभाग कार्यालयात भोसरी विधानसभाअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपन्न झाली, सर्वप्रथम सदस्य सचिव निलेश भदाणे तथा उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी अध्यक्षांचे स्वागत करून बैठकीची रूपरेषा सांगितली. सदर बैठकीत भोसरी विधानसभाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. क, इ व फ या प्रभागांतर्गत प्रभाग स्तरावरून पडताळणी केलेले अर्ज व त्यांवर केलेली कार्यवाही याबाबत चर्चा झाली बैठकीदरम्यान अध्यक्ष यांनी अर्ज पडताळणी दरम्यान येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व संबंधित अडचणी महिला व बालकल्याण विभागामार्फत सोडविण्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. तदनंतर अध्यक्ष प्रत्यक्ष अर्ज भरतांना अंगणवाडी सेविका तसेच प्रभाग स्तरावरील कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत त्यांच्याशी संवाद साधला.आजच्या बैठकीत प्रभाग अधिकारी तथा उप आयुक्त सिताराम बहुरे, अण्णा बोदडे , तहसीलदार जयराज देशमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका काळे व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments