चिंचवडगावातील वेताळनगर येथे टाकाऊ पदार्थांचा वापर करुन रायगडाची प्रतिकृती साकारली आहे.हि प्रतिकृती 20×20 फुटाची असून चिंचवड मधील नागरिंकांचे आकर्षण बनली आहे. ही प्रतिकृती सामाजिक कार्यकर्ते राजेशभाऊ आरसूळ यांच्या संकल्पनेतून साकारली असून गडप्रेमी कलाकार रघुराज येरंडे व ऋषीकेश परदेशी यांनी विविध टाकाऊ पदार्थापासून तयार केली आहे.
या प्रतिकृतीसाठी सुमारे तिनशे तेलाचे रिकामे डब्बे , एक ट्रॅक्टर विटांचे तुकडे, 50 रिकामी पोती, एक टॅक्टर काळी माती, पिओपी, पाचशे लिटर पाणी , काळा , पिवळा, हिरवा रंग, तसेच दोन पोते लाकडी भूसा इत्यादी साहित्याचा वापर करुन ही प्रतिकृती तयार केली आहे. तसेच रायगडाप्रमाणे रोप – वेही बनविण्यात आला आहे , तसेच गडावरील विविध भागांच्या माहीतीचे छोटे – छोटे फलक पण या प्रतिकृतीवर लावलेले आहेत.
दिवाळी निमित्त मातीचे किल्ले बनविण्याची प्रथा पंरपरा खुप जुनी आहे , याला अनुसरुनच वेताळनगर व चिंचवड येथील नागरिंकाना या भव्य रायगडाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्यांची माहीती व्हावी या भावनेने हि प्रतिकृती तयार केली आहे असे सामाजिक कार्यकर्ते राजेशभाऊ आरसूळ यांना सांगितले.