Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीमहिलांच्या त्यागामुळेच कुटुंबाची व देशाची प्रगती - उपमहापौर शर्मिला बाबर

महिलांच्या त्यागामुळेच कुटुंबाची व देशाची प्रगती – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त स्नेह मेळावा 

कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, महिलांच्या सन्मानात दरवर्षी जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु वर्षातील एक दिवस महिलादिन साजरा करण्याऐवजी रोज आत्मीयतेने महिलांना मान, सन्मान देऊन आदर राखून त्यांचे कौतुक केले पाहिजे. महिलांच्या त्यागामुळेच  त्यांच्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती होते. आज देशाच्या राष्ट्रपती पदावर, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर, राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदांवर महिला कार्यरत आहेत. त्या सर्व सावित्रीच्या, जिजाऊंच्या आणि रमाईच्या लेकींमुळेच देशातील लोकशाही बळकट होत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. २८) स्नेह मेळावा व नवनिर्वाचित नगरसेविका, बचत गटांच्या अध्यक्षा, महिला पत्रकार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर बाबर बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सारिका मासुळकर, शितल वर्णेकर सुप्रिया चांदगुडे, वर्षा जगताप, अनुराधा गोरखे, शालिनी गुजर, अर्चना सस्ते, रवीना आंगोळकर,  सुजाता बोराटे, स्नेहा कलाटे, तृप्ती कांबळे, शिवानी नरळे आणि महिला पत्रकार संघाच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, श्रद्धा प्रभुणे, सायली कुलकर्णी, माधुरी कोराड, मंदा बनसोडे, प्राजक्ता जाधव, श्रद्धा कोतवडेकर, लीना माने, ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, अनिल कातळे, प्रवीण शिर्के, , देवा भालके, सुनील उर्फ बाबू कांबळे, अविनाश कांबीकर, विनय लोंढे, दिनेश दुधाळ, रोहित खर्गे, विशाल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महिला पत्रकार संघाच्या वतीने सर्व नगरसेविका, बचत गट अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता व जेष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ,  स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे, नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ यांनीही महिलांना शुभेच्छा दिल्या. स्वागत अर्चना मेंगडे, सूत्रसंचालन संदीप साकोरे, आभार श्रद्धा प्रभुणे यांनी मानले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments