चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची खरी रंगत आजपासून मंगळवार (दि.३१) वाढणार आहे. आजपासून निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होणार आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना आजपासून अर्ज दाखल करता येणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार आज दि.३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २६ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे.
त्यासाठी निवडणूक आयोगाने २४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्ती केली आहे. हे अधिकारी, कर्मचारी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या थेरगावातील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात हजर राहणार असून ते निवडणुकीचे केंद्र असणार आहे.
- पोटनिवडणूक कार्यक्रम..
- ३१ जानेवारी – उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू
- ०७ फेब्रुवारी – उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
- ०८ फेब्रुवारी – अर्जांची छाननी
- १० फेब्रुवारी – अर्ज माघारीचा शेवटचा दिवस
- २६ फेब्रुवारी – मतदान
- ०२ मार्च – मतमोजणी