पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (घरकुल, पूर्णानगर, कृष्णानगर, शरदनगर –) हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या प्रभागात ‘बाहेरचा उमेदवार’ हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता असून, स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार असा थेट संघर्ष रंगताना दिसत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रभाग ११ ची अधिकृत अंतिम उमेदवार यादी जाहीर झाली असून, चारही जागांसाठी एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेषतः ‘अ’ जागेसाठी तब्बल १६ उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत अटीतटीची ठरणार आहे.
‘अ’ जागेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक अपक्ष उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या जागांवरही प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना होत असून, बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षवेधी आहे. यामुळे पारंपरिक गणिते कोलमडण्याची दाट शक्यता असून, मतदारांचा कल शेवटच्या टप्प्यात निर्णायक ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक ११: अंतिम उमेदवार
‘अ’ जागा (सर्वाधिक १६ उमेदवार):
विश्वास भगवान गजरमल – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कुंदन अंबादास गायकवाड – भारतीय जनता पार्टी
मारूती गणपत जाधव – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
अक्षय भिमा बोबडे – शिवसेना
सुनिल प्रभू गायकवाड – वंचित बहुजन आघाडी
अविनाश गोरोबा जोगदंड – सनय छत्रपती शासन
ज्ञानेश्वर महादेव उदागे – अपक्ष
आयु. बाबासाहेब गोविंदजी कांबळे – अपक्ष
मिलिंद रोहिदास कांबळे – अपक्ष
सुनंदा बबन कांबळे – अपक्ष
विकासराजे बापू केदारी – अपक्ष
विनोद जगन्नाथ गायकवाड – अपक्ष
पाडुरंग कोडिंबा पाटोळे – अपक्ष
रमा राजेंद्र बनसोडे – अपक्ष
निलध्वज रामचंद्र माने – अपक्ष
सचिन उद्धव शिंदे – अपक्ष
‘ब’ जागा (८ उमेदवार):
ज्योती विनोद गोफणे – शिवसेना
सुभद्रा ईश्वर ठोंबरे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुजाता हरिदास विधाते – आम आदमी पार्टी
रिटा सचिन सानप – भारतीय जनता पार्टी
मयुरी साणे निलेश – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
मंगल अशोक सोनवणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शोभा मंगेश खंडागळे – अपक्ष
अर्चना योगेश सोनवणे – अपक्ष
‘क’ जागा (६ उमेदवार):
मोहर युवराज कोकाटे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे – भारतीय जनता पार्टी
सत्यभामा संजय नेवाळे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
प्रणिती अनिकेत बाबर – शिवसेना
शलाका सुधाकर कोंडावार – सनय छत्रपती शासन
रयिसा खदीर पठाण – अपक्ष
‘ड’ जागा (८ उमेदवार):
काशिनाथ संभाजी जगताप – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निलेश मधुकर नेवाळे – भारतीय जनता पार्टी
नारायण सदाशिव बहिरवाडे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
कुणाल सुदाम वक्टे – आम आदमी पार्टी
मोईज इस्माईल बागवान – वंचित बहुजन आघाडी
सुरज चंद्रकांत गायकवाड – अपक्ष
धनराज सतिश जाधव – अपक्ष
संतोष दत्तात्रेय शेंडगे – अपक्ष
या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सर्वच जागांवर चुरशीची लढत अपेक्षित आहे. त्यातच शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांमुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
एकूणच प्रभाग क्रमांक ११ हा निवडणुकीत ‘बाहेरचा उमेदवार’ वाद, स्थानिक प्रश्न आणि मतविभाजन यामुळे हा प्रभाग नेमका कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे लक्ष लागले आहे.


