३ एप्रिल २०२१,
राज्यात दररोज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा कमालीची वाढत असून आज पुन्हा एकदा नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत तो ५० हजारांच्या आसपास सरकू लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७, हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३७ हजार ८२१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहचली आहे.
दरम्यान आज दिवसभरात ३७ हजार ८२१ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.४९ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.