Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला उद्या पुन्हा युक्तिवाद होणार… महाराष्टाचे लक्ष

ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला उद्या पुन्हा युक्तिवाद होणार… महाराष्टाचे लक्ष

ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला कोर्टाकडून पुन्हा तारीख पे तारीख मिळाली आहे. कारण आजही ओबीसी आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली नाही. त्यामुळे उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे. आज ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर युक्तीवाद झाला, त्यानंतर कोर्टाने उतरलेल्या युक्तिवादासाठी उद्याची तारीख दिली आहे.

आज कोर्टात राज्य सरकारकडून इंपेरिकल डेटा मिळावा यासाठी युक्तिवाद करण्यात आला. आजची सुनावणी जवळपास अर्धा तास चालली, त्यात निवडणुकांबाबतही युक्तिवाद झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र आज सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यानंतर उर्वरीत सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे आजही कोर्टात ओबीसी आरक्षणाला तारीख पे तारीख मिळाल्याचं पहायला मिळाले.

दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुका मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांचे काय होणार? हाही पेच कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भिजत पडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments