Tuesday, December 9, 2025
Homeगुन्हेगारीपुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडण्याचे प्रमाण वाढले… १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या.. दुसरा बळी

पुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडण्याचे प्रमाण वाढले… १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या.. दुसरा बळी

पुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सोशल मीडिया ॲपवर चॅटिंग करुन फेक अकाउंटवरुन तरुणाची मैत्री जमवणे, त्यांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढणे आणि त्यानंतर तरुणांचे अर्ध नग्न फोटो मागवले जात आहे. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल असे धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. असे अनेक प्रकार पुण्यात घडले असून काही दिवसांपूर्वी धनकवडीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज दत्तवाडी परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली आहे.

पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाची प्रीत यादव या तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. याचा गैरफायदा घेत त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून या १९ वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा तरुण राहत होता. शंतनू याची इन्स्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेअर केले. त्यानंतर मला पैसे दे, अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल, अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने ४ हजार ५०० रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मात्र, या प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनूच्या सर्व विधी प्रक्रिया आटोपल्यानंतर गुन्हा गुन्हा दाखल करणार होतो अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. म्हणून या प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments