Thursday, May 15, 2025
Homeउद्योगजगतशहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी महापालिका खासगी एजन्सी नियुक्त करणार

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी महापालिका खासगी एजन्सी नियुक्त करणार

९ जून २०२१,
अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चरवर आणि विद्युत खांबावर लावल्या जाणाऱ्या जाहिरात फलकांचे प्रमाण वाढत आहे. ते पडून जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. ते टाळण्यासाठी प्रभागनिहाय अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याची कार्यवाही अंतिम स्तरावर आहे.पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे प्रमाण वाढले आहे. जाहिरातदारांनी अनधिकृत जाहिरात फलक अधिकृत करून घेणे आवश्यक आहे.

शहरात ३१ मार्चपूर्वी अस्तित्वात असलेले जाहिरात फलक अधिकृत केले जाणार आहेत. त्यासाठी जाहिरातदारांनी १५ दिवसांत आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत. प्रत्येक फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक फलक काढले जातील. त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पथक, ठेकेदाराकडील मजूर, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडील कर्मचारी असे मनुष्यबळ उभे करायचे आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments