Wednesday, February 21, 2024
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो निव्वळ म्हणजे जिवंत देखावा… शहरवासियांसाठी फक्त आकर्षणाचा विषय

पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो निव्वळ म्हणजे जिवंत देखावा… शहरवासियांसाठी फक्त आकर्षणाचा विषय

पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो निव्वळ जिवंत देखावा ठरत आहे. मेट्रो सुरू होऊन एक वर्ष उलटूनही मेट्रो स्टेशनचे काम अपूर्ण, प्रवासी संख्येत सातत्याने होणारी घट यामुळे गेल्या काही महिन्यांत शहरातील मेट्रो शहरवासियांसाठी फक्त आकर्षणाचा विषय ठरत आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा मार्च २०२२ रोजी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. त्याच दिवसापासून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. सुरुवातीला उत्सुकता म्हणून नागरिकांनी मेट्रो सफरीला मोठा प्रतिसाद दिला. मात्र, दोन ते तीन महिन्यांत मेट्रोची नवलाई कमी झाली. सध्या ती रिकामीच फिरत आहे. मेट्रो सुरू झाल्याने उर्वरित कामे वेगात पूर्ण करण्यावर ‘महामेट्रो’ने भर दिल्याचा दावा केला होता. मात्र, एक वर्ष होत आले, तरी अद्याप कामे अपूर्ण स्थितीत आहेत. डिसेंबर २०२२पर्यंत पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंत मेट्रो नागरिकांसाठी खुली करण्याचे ‘महामेट्रो’चे कार्यकारी व्यवस्थापक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी जाहीर केले होते. मात्र, फेब्रुवारी २०२३ उजाडला, तरी मेट्रो काही पुण्यापर्यंत पोहोचली नाही.

वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यवाचन, शूटिंग, महिला मेळावा, ढोलवादन आदींसाठी स्टेशन व मेट्रो भाड्याने दिली जात आहे. स्टेशनला प्रायोजकत्व देणाऱ्या खासगी कंपन्यांचे नाव दिले जात आहे. त्यावरून ‘महामेट्रो’वर टीका केली जात आहे.

स्टेशनची कामे अपूर्णच

पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट अशी मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मात्र, दापोडी, बोपाडी, खडकी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या पाच मेट्रो स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण आहेत. मार्गिकेचे कामही केले जात आहे. दापोडी, बोपोडी व खडकी या स्टेशनच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूककोंडीने वाहनचालक त्रस्त आहेत. नियोजित रेंजहिल्स मेट्रो स्टेशनचे काम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे खडकी रेल्वे स्टेशननंतर थेट शिवाजीनगरला थांबा असणार आहे.

चालू मार्गांवरही स्टेशनचे काम अपूर्ण

सध्या पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी या स्टेशनवर मेट्रो धावते. यापैकी संत तुकारामनगर आणि फुगेवाडी वगळता एकाही स्टेशनचे काम पूर्णपणे झालेले नाही. पिंपरी स्टेशनचे पादचारी पुलाचे काम अपूर्ण असून, भोसरी स्टेशनला पेंटिंग, जिना आणि स्लॅब कव्हरिंगचे काम अपूर्ण आहे. कासारवाडी स्टेशनला जिना, प्रवेशद्वार, बाहेरील पेंटिंगचे काम अपूर्ण असून, स्वयंचलित जिनाही बंद आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो स्टेशनची गरजेनुसार कामे सुरू आहेत. अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- हेमंत सोनावणे,जनसंपर्क अधिकारी,

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments