आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. यंदाचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट बस स्टँडवरील महिलेवर अत्याचार या प्रकरणांवरुन सरकारला घेराव घातला जाऊ शकतो.
आज पुरवण्या मागण्या आणि शोक प्रस्ताव सादर केला जाईल. विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूरू केलेल्या
अनेक कल्याणकारी योजनांनमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची चर्चा आहे. यामुळे सरकारच्या धोरणांविरोधात विरोधक अधिवेशनात घेराव घालतील. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. सकाळी 10.30 वा. विधिमंडळ पायरीवर विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे. तर 11 वाजता विधानसभा कामकाज सुरू होईल.