Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब...

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

पिंपरी : संत तुकाराम व्यापारी संकुल, निगडी येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहासाठी ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ साहित्यिक, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ महिलांच्या सोयीसाठी स्वतंत्र लिफ्ट (उद्वाहक) बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना २७ मे १९०६ रोजी झाली असून संस्थेला ११९ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा गेली ३५ वर्षे साहित्य, संस्कृती आणि वाचन चळवळीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. शाखेचे साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम संत तुकाराम व्यापारी संकुलातील शांता शेळके सभागृहात नियमितपणे आयोजित केले जातात.

मात्र, हे सभागृह दुसऱ्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ साहित्यिक, दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ महिलांना जिना चढणे-उतरणे अत्यंत कष्टदायक ठरत आहे. त्यामुळे अनेक मान्यवर साहित्यिक व ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संत तुकाराम व्यापारी संकुलातील शांता शेळके सभागृहासाठी थेट दुसऱ्या मजल्यापर्यंत स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments