वरळी हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपाी मिहिर शाह याला अटक झालीये. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी मिहिर याला अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं. मिहीर शाह त्याच्या कुटुंबियांना घेऊन मित्रासह शहापूरला एका रिसोर्टमध्ये लपला होता. तीन दिवस झाले मात्र फरार आरोपीला शोधण्यासाठी वेळ लागल्याने मुंबई पोलिसांवर टीका होऊ लगाली होती. आरोपीने प्लान करत पळ काढला होता. पण मिहीरच्या मित्राने एक चूक केली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
आरोपी मिहिर शाहने स्वत: चा आणि मित्राचा मोबाईल बंद ठेवला होता. मिहिर हा त्याचा पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली होती. रात्री मिहिर शहा शहापूरच्या रिसॉर्टमधून विरारला आला. या दरम्यान त्याच्या मित्राने एक चूक केली ती म्हणजे आज सकाळी 15 मिनिटांसाठी मिहिरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला. हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं.
पोलिसांचा संशय बळावल्याने वरळी पोलिसांचे बोरिवली येथे असलेले पथक लोकेशन ट्रेस झालेल्या ठिकाणी म्हणजेच विरारला पाठवले. पोलिसांनी विरार फाट्यावर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये मिहीर शाहसह बारा जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये त्याच्या आईसह दोन बहिणी आणि मित्रांचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईमधील वरळी येथे सकाळ पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांची साडी कारच्या चाकात अडकली त्यानंतर महिलेला काही किलोमीटर फरफटत नेलं.
मृत्यू झालेल्या महिलेचे पती प्रदीप नाखवा यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीच्या अंगावरील कपडेही फाटले होते. आरोपी आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता. त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्याशी फोनवर बोलत त्याने आपला फोन स्विच ऑफ केला होता.