Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीबुधवारी परभणी येथे सर्वात कमी तापमानाची नोंद.

बुधवारी परभणी येथे सर्वात कमी तापमानाची नोंद.

12 November 2020.

नोव्हेंबर महिना पुढे सरकत आहे तशी थंडी आणखी वाढत आहे. दिवाळीच्या तोंडावर गारठ्यात भर पडली असून पुणे,मुंबईसह,नाशिकही गारठले आहे.

बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ९.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस आहे.

पहाटेच्या गारव्यामुळे पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे.राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर गारठला आहे.

पुण्यासह नाशिकमध्येही थंडीने कहर केला असून, गेल्या ४ दिवसांपासून पुणे आणि नाशिकचे किमान तापमान सातत्याने १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तर मुंबईचे किमान तापमान २२ ते १९ अंश नोंदविण्यात येत असून आहे.

महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.सांगली, नांदेड, सातारा, बारामती, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जालना येथील किमान तापमान १५ अंशाखाली घसरले.

दिवाळीत थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्या उत्तर पूर्वेकडून हवा दक्षिणेच्या दिशेने वाहत आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती थंड हवेच्या लाटेच्या जवळपास जाणारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments