Sunday, February 8, 2026
Homeउद्योगजगत“सर्वांत मोठी नैसर्गिक वॉल” म्हणून एशिया बुक मध्ये किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीची नोंद

“सर्वांत मोठी नैसर्गिक वॉल” म्हणून एशिया बुक मध्ये किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीची नोंद

१० जुलै २०२१,
किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी लि. मधील नैसर्गिक ग्रीन वॉल (व्हर्टिकल गार्डन) ची दि. 10 जुलै 2021 रोजी “सर्वात मोठी नैसर्गिक ग्रीन वॉल” म्हणून एशिया बुक ऑफ रेकार्डस 2021 मध्ये नोंद झाली. एशिया बुक ऑफ रेकार्डस चे परीक्षक श्री. बिस्वदीप रॉय चौधरी यांनी परीक्षण करून किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी लि. मधील या नैसर्गिक ग्रीन वॉलची “सर्वांत मोठी नैसर्गिक वॉल” म्हणून नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व सन्मान पदक देवून घोषणा केली.

सदर ग्रीन वॉलची लागवड सन. 2009 मध्ये केली गेली होती. जेंव्हा आमच्या कंपनीच्या आवारातून पुणे – सोलापूर रोडवरील फ्लाय व्होअरची बांधणी झाली, त्या फ्लाय व्होअरच्या पायथ्याशी (Ficus Repens) वाघनखी वेल याची रोपटे समान लागवड करण्यात आली होती. गेल्या 11 वर्षांच्या कालावधीत सदर वेलीने एक विशाल स्वरूप धारण करून 16000 sq. ft. चे व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये रूपांतर झाले आहे.

या अथांग अशा व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरे इत्यादी जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. या व्हर्टिकल ग्रीन वॉल मुळे कंपनी परिसरात तापमान कमी होवून प्रदूषणास आळा बसलेला आहे. सदर व्हर्टिकल ग्रीन वॉलच्या देखभाली मध्ये कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य कौशिक, कंपनीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक श्री. के. श्रीनिवासन, एचआर विभागाचे व्हाईस प्रेसिडेंन्ट श्री. सदाशिब पाढी, फॅक्टरी मॅनेजर श्री. गणेश चौधरी, कंपनीच्या ईस्टेट ॲन्ड एन्व्हार्यनमेंट विभागाचे अधिकारी श्री. प्रकाश कुलकर्णी व श्री. मंगेश कुलकर्णी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व योगदान लाभलेले आहे.

या कार्यक्रमाचे वेळी एशिया बुक ऑफ रेकॉर्डसचे श्री. बिस्वदीप रॉय चौधरी, एस.पी. कॉलेजच्या बॉटनी डिपार्टमेंटच्या सौ. अनुराधा कुलकर्णी, किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतर्फे श्री. अमन राहुल किर्लोस्कर, श्री. सदाशिब पाढी, श्री. गणेश चौधरी श्री. सचिन मुजुमदार, श्री. प्रकाश कुलकर्णी, श्री. मंगेश कुलकर्णी, कु. सौम्या कोडड व युनिक लॅबचे श्री. कौशल कुलकर्णी उपस्थित होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्डस कडून श्री. अमन राहूल किर्लोस्कर यांनी कंपनीतर्फे सन्मान पदक व प्रमाणपत्र स्विकारले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. गणेश चौधरी, फॅक्टरी मॅनेजर यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments