१५ जुलै २०२१,
सध्या सर्वत्र वेब सीरीजचे वारे वाहत आहेत. नवनवीन वेब सीरीज प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरत आहेत. अशातच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन वेब सीरीज यूट्यूब वरती प्रदर्शित झाली आहे. 7 मित्रांची प्रोडक्शन निर्मित ‘’खटपटवाडी’’ नावाची ही वेबसिरीज गावखेड्यातील गमतीजमती, राजकारण आणि प्रेमाचा साज या जॉनरमधली असून यात अजय साठे, स्वप्नील पटेकर, ज्योती जैसवाल हे प्रमुख भुमिकेत असणार आहेत. नुकत्याच यूट्यूब वरून प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.
कुठलीही वेब सीरीजमध्ये कलाकार त्यांच्या अभिनयानं एक वेगळी जादू दाखवत असतात. तर ‘खटपटवाडी’ या वेब सीरीजमध्ये संतोष कसबे, सौम्या बोस, सुरेखा काते, वनिता दोशी, सुरेश मिसाळ, बजरंग रंदवे, फेबियन सॅमसन, विशाल थोरात, निलेश पवार, दशरथ जाधव, एकनाथ गालफाडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
एक वेगळेपण देण्याचा प्रयत्न
या वेबसीरिज चे लेखन व दिग्दर्शन प्रा. विशाल पवार यांनी केले आहे. “मराठी आशयाला धरून यूट्यूब वरती सहसा सिनेमा पद्धतीने वेबसीरिज जास्त करुन पाहायला मिळत नाही. मात्र आम्ही सिनेमा पद्धतीने वेबसीरिज कशी बनवता येईल या साठी प्रयत्नशील राहणार आहोत” असे मत त्यांनी व्यक्त केले. अजय साठे यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. ते म्हणाले की, “विविध विषयांना हात घालत प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करता येईल हाच विचार करुन या वेबसीरिज ची निर्मिती करण्यात आली आहे.”
पडद्यामागील कलाकार
सतीश रणदिवे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी स्विकारली असुन संतोष कसबे हे प्रोडक्शन मैनेजर आहेत. एकनाथ गालफाडे हे सहाय्यक लेखक, स्वप्निल पटेकर हे डीओपी, सिद्धार्थ चौधरी हे एडिटर म्हणून काम पाहत आहेत. तर गणेश-वैभव या संगीतकार जोडीने दिलेल्या संगीताने एक वेगळेपण या वेबसीरिजला लाभले आहे. ९ जुलै पासून ही वेब सीरीज यूट्यूब वरती प्रदर्शित झाली आहे. अस्सल गावरान मनोरंजनाची हमी देणारया या वेब सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा सब्सक्राय करा… असे आवाहन सर्व कलाकारांनी केले.