Wednesday, May 14, 2025
Homeआरोग्यविषयकदीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला प्रकार असंवेदनशील, जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला प्रकार असंवेदनशील, जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भिसे कुटुंबाची घेतली भेट  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. आज पीडित भिसे कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भिसे कुटुंबाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज भिसे कुटुंबीयांनी माझी भेट घेतलेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे. मी तयार केलेली कमिटी या ठिकाणी आलेली आहे. मी या प्रकरणात सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”

दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “भविष्यात पुन्हा असे प्रकरण घडू नये म्हणून नियमावली करणे आवश्यक आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालय हे स्वर्गीय लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबाने खूप मेहनतीतून उभारलेले आहे. नावाजलेले रूग्णालय आहे. तिथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळे चूक आहे असे म्हणून चालणार नाही. मात्र काल घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच होता.”

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला मला आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जोपर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत याप्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मात्र, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्याने काही अधिकार देण्यात आले आहेत. भविष्यात त्यादृष्टीने कायद्यात बदल केला जाईल. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments