Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीसुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर का क्रॅश झालं त्याची माहिती समोर आलेली नाही. महाड या ठिकाणी ही घटना घडली आहे. 

सुषमा अंधारेंनी अपघाताबद्दल काय म्हटलं आहे?

मी प्रचासभेसाठी जायचं होतं. दोन ते तीन सभा करायच्या होत्या आणि मंडणगड तसंच रोहा या ठिकाणी जायचं होतं. त्याआधीच ही घटना घडली आहे. महाडची सभा करुन मुक्कामाला थांबले होते. हेलिपॅडजवळ आम्ही होतो. चॉपर येणार होतं. चॉपरने ते दोन ते तीन घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला. तसंच धुळीचे लोट उठले. सुरुवातीला नीट काही समजलं नाही. पण आजूबाजूचे सगळे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका. मला कॅप्टनची चिंता होती की ते सुखरुप आहेत की नाही? मात्र कॅप्टन सुखरुप आहेत. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे प्रवास करणार होतो पण आम्ही सगळे सुखरुप आहोत. प्रवास सुरु करण्याआधीच ही घटना घडली. असं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे.

सुषमा अंधारे कोण आहेत?

सुषमाअंधारे या पेशानं एक वकील आहेत. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी तसंच स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केलं होते. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या खास भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments