३ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ३ एप्रिल २०२१ रोजी २९०५ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २८३२ तर शहराबाहेरील ७३ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४७५४६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२४८४४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०४९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ११ पुरुष आकुर्डी (४४वर्षे), निगडी (८९ वर्षे), पिंपरी (५८,८५,७६,७२,७८ वर्षे), वाल्हेकरवाडी (६० वर्षे), देहू आळंदी रोड ( ८४ वर्षे), चिखली ( ८२ वर्षे), सांगवी (५६ वर्षे) ०४ स्त्री – आकुर्डी (६८ वर्षे), किवळे (९५ वर्षे), काळभोर नगर (७५ वर्षे), चिंचवड (५० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – विश्रांतवाडी (६५, ७२ वर्षे) येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | २५७ | ५ | तालेरा | ५२७ |
२ | भोसरी | ३८३ | ६ | थेरगाव | ३४१ |
३ | जिजामाता | ५१३ | ७ | यमुनानगर | ३२१ |
४ | सांगवी | ३७० | ८ | वायसीएम | १२० |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | ३५६ | ५ | इ | ३३६ |
२ | ब | ४२३ | ६ | फ | ३५५ |
३ | क | ३७८ | ७ | ग | २९६ |
४ | ड | ३९९ | ८ | ह | २८९ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.