Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीथोर स्वातंत्र्यसेनानी लहुजी वस्ताद साळवे हे पराक्रमी आणि युध्दनिती निपूण महान योद्धे-...

थोर स्वातंत्र्यसेनानी लहुजी वस्ताद साळवे हे पराक्रमी आणि युध्दनिती निपूण महान योद्धे- महापौर उषा उर्फ माई ढोरे

थोर स्वातंत्र्यसेनानी लहुजी वस्ताद साळवे हे पराक्रमी आणि युध्दनिती निपूण महान योद्धे होते, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास महापौर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, नगरसदस्य तुषार हिंगे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माजी महापौर कवीचंद भाट, माजी नगरसदस्य मारुती भापकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, पदाधिकारी शिवाजी साळवे, नितीन घोलप, अनिल गायकवाड, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, नाना कसबे, भगवान शिंदे, अरुण जोगदंड, दत्तू चव्हाण, केसरताई लांडगे अनिल सौंदडे, महेश खिलारे, दशरथ सकट, विशाल कसबे, बाळासाहेब पाटोळे, सुरेश सकट, आसाराम कसबे, किशोर हातागळे, अण्णा कसबे, मयुर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंतीनिमित्त क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित “गरजला छावा सिंहाचा” हा शाहिरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते शाहीर बापू पवार यांनी क्रांतिगीते यावेळी सदर केली. दरम्यान थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सुत्रासंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments