Friday, September 13, 2024
Homeगुन्हेगारीसिहंगडरोड परिसरातील ‘कोयता गँग’ ची मस्ती पोलिसांनी जिरवली….

सिहंगडरोड परिसरातील ‘कोयता गँग’ ची मस्ती पोलिसांनी जिरवली….

शहरातील ‘कोयता गँग’चा विषय विधीमंडळात गाजत असताना आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले नागरिक पळत सुटले होते. गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीनाला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करण दळवी (रा.,वडगाव) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांची नावे आहेत. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न आणि आर्म अॅक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत घडली. मात्र, जवळच सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल असल्याने त्यांनी पाठलाग करून आरोपीला पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी सुरवातीला रस्त्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कोयत्याने वार केले. यानंतर येथील एका हॉटेलमध्ये घुसून एका ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला. तेथून पुढे रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केला. यानंतर आणखी एकाच्या पाठीवर प्लॅस्टीकचा स्टुल फेकून मारला.

दोघांनी मिळून परिसरात तब्बल २० मिनिटे धुडगूस घातला होता. सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे वडगाव हद्दीत गस्त घालत होते. याबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत चालले होते. पोलिसांना बघताच दोघांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील आणि इंगवले यांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments